युतीचा फार्स की गांभीर्याने चर्चा याबाबत मात्र साशंकता...!

मुंबई मध्ये भाजप आणि सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी वरकरणी युतीची भूमिका घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये ही युतीची बोलणी सुरू झालीयेत...! दोन्ही पक्षांनी युती साठी सकारात्मक भूमिका घेतलीय...! 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 13, 2017, 07:12 PM IST
युतीचा फार्स की गांभीर्याने चर्चा याबाबत मात्र साशंकता...!

कैलास पुरी, झी मीडिया पिंपरी चिंचवड : मुंबई मध्ये भाजप आणि सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी वरकरणी युतीची भूमिका घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये ही युतीची बोलणी सुरू झालीयेत...! दोन्ही पक्षांनी युती साठी सकारात्मक भूमिका घेतलीय...! 

गेली कित्येक दिवस 100 प्लस जागा जिंकू असा दावा करत आक्रमक प्रचार करणाऱ्या भाजपने आणि त्यांच्यापासून दूर असलेल्या शिव सेनेत युती बाबत आज चर्चा झाली..! 

अर्थात मुंबई मधल्या घडामोडींमुळं ही चर्चा होत असली तरी वरकरणी तरी दोन्ही पक्षांनी युती होण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतलीय...! भाजप बरोबर आम्ही युती करायला आम्ही तयार आहोत, पण भाजपने अवास्तव जागांची मागणी करू नये अशी भूमिका शिव सेनेनं घेतलीय..! भाजपने 20 तारखे पर्यंत युतीचा निर्णय जाहीर करावा असं ही सेनेनं स्पष्ट केलंय... 

भाजपने ही शिव सेनेप्रमाणेच युतीला आम्ही सकारात्मक असल्याचं सांगितलं.. अजित पवार यांची शहरातली सत्ता घालवण्यासाठी आम्ही प्रसंगी मोठे मन करून कमी जागा घेऊ असं भाजपने म्हंटलय.. एवढंच नाही तर इतर ठिकाणी युती झाली नाही तरी शहरात युती साठी आग्रही राहू असं भाजपने स्पष्ट केलंय... 

आता शहरात दोन्ही पक्षांनी युतीचा प्रस्ताव पुढं केलाय खरा पण जागा वाटप हाच दोन्ही पक्षातील प्रमुख मुद्दा असणारेय, त्यातच शिव सेना भाजपला जागा सोडण्यास तयार असली तरी भाजपचे सहयोगी पक्ष आर पी आय आणि रासप चे काय हा प्रश्न ही कळीचा आहे.. त्यामुळं युती ची बोलणी किती गंभीर्यानी पहायची हा खरा प्रश्न आहे ...

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x