सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दिला. आता दीपक केसकर ५ ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दीपक केसरकर यांनी राजीनामा दिलेले उद्योग मंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या राजकीय सामना केला. लोकसभा निवडणुकीत राणे यांच्याविरोधात खुलेआमपणे दंड थोपटले. राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात जाऊन त्यांनी शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांना मदत करण्याचे जाहीर पणे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. पक्षाच्या विरोधात केसरकर यांनी भूमिका घेतली. त्यांना वरिष्ठांकडून समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राणेंविरोधात संघर्ष कायम होता. आपल्याल राणेंचा दशहवाद संपवायचाय, असे सांगणत राष्ट्रवादीविरोधात बंडच पुकारले.
त्यांनी गेल्या महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणेंवर जोरदार 'प्रहार' केला. तसेच राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनाही टार्गेट केले. ते पक्षात दादागिरी करीत असल्याचे म्हटले. ते जे वागत आहेत, पक्षासाठी चांगले नाही, असे सांगून राष्ट्रवादीतील मक्तेदारीचे राजकारण चव्हाट्यावर आणले. त्याचवेळी आपण ऑगस्टमध्ये शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे सांगितले. लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांशी बैठक घेतली. त्यांचीशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला. आपण राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत शिसेनेत प्रवेश करणार आहोत. आपला लढा विकासासाठी चालूच राहिलं. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडू. सावंतवाडीतूनच आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळेल, असे त्यांनी सांगून विकासाचे राजकारणावर आमचा भर असेल असेल केसरकर म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.