ब्राम्हणांबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य दिलीप कांबळेंनी घेतलं मागे

सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ब्राम्हणांविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य मागे घेतलं आहे.

Updated: Mar 13, 2017, 10:03 PM IST
ब्राम्हणांबद्दलचं वादग्रस्त वक्तव्य दिलीप कांबळेंनी घेतलं मागे  title=

मुंबई : सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ब्राम्हणांविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य मागे घेतलं आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नसल्याचं स्पष्टीकरण कांबळेंनी दिलंय.

लातूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला. राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी झालेल्या भाषणात राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा तोल ढळला. विरोधी पक्षातले काही जण सरकार विरोधात घोषणाबाजी करतात. त्यांनी आपल्या समोर घोषणा द्याव्यात आपण त्यांचे मुस्काट फोडू असा दमच, दिलीप कांबळे यांनी भरला. एवढ्यावरच न  थांबता, जातीवाचक विधानही त्यांनी केलं. दरम्यान होळी असल्यामुळे दिलीप कांबळे यांचं विधान कोणी मनावर घेऊ नये अशी सारवासारव, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. 

पाहा नेमकं काय म्हणाले होते दिलीप कांबळे