विनायक मेटे यांच्या कार्यक्रमात गोंधळ

आरक्षण मिळालं नाही, तर आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा मेटेंनी यावेळी केली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 5, 2017, 04:43 PM IST
विनायक मेटे यांच्या कार्यक्रमात गोंधळ title=

औरंगाबाद : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या कार्यक्रमात गोंधळ झालाय. सकल मराठा मोर्चाच्या कार्यालयाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं. मेटे भाषणाला उभे राहताच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. 

गोंधळातच मेटेंनी आपलं भाषण पुढे रेटलं. मराठा समाजासाठी आपण खूप काम केलंय. आरक्षण मिळालं नाही, तर आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा मेटेंनी यावेळी केली.