रेल रोको केलेल्या २०० जणांवर गुन्हा दाखल

कोपर - डोंबिवली स्टेशन दरम्यान रेल रोको केलेल्या २०० जणांवर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  रेल्वे अधिकाऱ्यांनी कारवाईची नोटीस बजावण्यात आल्यानंतर कोपर स्थानकाजवळील झोपडपट्टीवासियांनी रेल रोको केला होता. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

Updated: Jan 12, 2017, 08:31 PM IST
रेल रोको केलेल्या २०० जणांवर गुन्हा दाखल title=

डोंबिवली : कोपर - डोंबिवली स्टेशन दरम्यान रेल रोको केलेल्या २०० जणांवर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  रेल्वे अधिकाऱ्यांनी कारवाईची नोटीस बजावण्यात आल्यानंतर कोपर स्थानकाजवळील झोपडपट्टीवासियांनी रेल रोको केला होता. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

रेल्वे रोकोमुळे दुपारी मध्य रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांना डोंबिवली स्टेशनवर अडकून पडावे लागले होते. तसेच कोपर येथेही गाड्या खोळंबल्या होत्या.
 
कोपर स्थानकाजवळील सिद्धार्थनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना रेल्वेतर्फे कारवाईची नोटीस बजावण्यात आली होती. झोपडपट्टी तोडण्याच्या कामाच्या निषेधार्थ झोपडपट्टीवासियांनी रेल्वे अधिका-यांच्या कारवाईचा निषेध करत हे रेल रोको केले होते.