चुकूनही तुमची कार अशा ठिकाणी घेऊन जाऊ नका...

तुमची कार कधीही समुद्राच्या तटावर फिरवू नका, अशा ठिकाणी गाडी चालवण्याचा उत्साह जरी वेगळा असला.

Updated: May 15, 2016, 09:01 PM IST

रत्नागिरी : तुमची कार कधीही समुद्राच्या तटावर फिरवू नका, अशा ठिकाणी गाडी चालवण्याचा उत्साह जरी वेगळा असला, तरी कार फसली, तर तुम्हाला ती बाहेर काढणे महागात पडेल.

एवढंच नाही तर भरती सुरू झाली, तर खारट पाण्याने तुमच्या कारचं कायमचं नुकसान होईल, तेव्हा कधीही पर्यटनाला गेले तर तुमची कार समुद्रतटावरील वाळूवर घेऊन जाण्याचा मोह टाळा.

ही कार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या मुरूड बिचवर फसली होती. खूप मेहनत घेऊनही तिला बाहेर काढण्यात यश येत नव्हते.