राज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर

राज्यातल्या 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय... तसंच या दुष्काळावर काही उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्यात. मंत्रिमंडळ उपसमितीनं ही घोषणा केलीय.

Updated: Oct 16, 2015, 04:26 PM IST
राज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर title=

मुंबई : राज्यातल्या 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय... त्यामुळे, टंचाई की दुष्काळ? हा शब्दांचा खेळ अखेर संपलाय.  

मंत्रिमंडळ उपसमितीनं ही घोषणा केलीय. राज्यात टंचाई नसून दुष्काळ पडल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलंय. तसंच यावेळी दुष्काळावर काही उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्यात. 

उल्लेखनीय म्हणजे, राज्यात दुष्काळवर कर लावल्यात आल्यानंतर राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. 

वीजपंपांच्या वीजबिलात 33.5 टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कापूस, ज्वारी, सोयाबीन आणि मका खरेदी केंद्र तातडीनं सुरू केली जाणार आहेत. 

50 पेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावांचा दुष्काळग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आलाय. तसंच, या ठिकाणच्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्कही माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.