अकोला : जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे दीड कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुतण्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलंय.
या प्रकरणात हरिष खडसेसह राष्ट्रवादीचे सभापती रमेश हिंगणकर याच्यासह चौघांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. २०११ मध्ये बाजार समितीनं दिलेल्या २ कोटी ९७ लाखांच्या कामात १ कोटी ४४ लाखांचा अपहार झाल्याचा ठपका तांत्रिक सर्वेक्षणात ठेवण्यात आलाय.
अकोल्यातल्या 'मेसर्स.के.जी.खडसे एंड असोसिएट्स' या खासगी कंपनीला हे कंत्राट देण्यात आलं होतं. ही कंपनी एकनाथ खडसेंचा भाऊ आणिपुतण्याची आहे. न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे खडसेविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय.
दरम्यान, या प्रकरणी कठोर भूमिका घेणारे बाजार समिती सचिव राजकुमार मावळे यांनी आपला मानसिक छळ होत असल्याची तक्रार केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.