पुणे : ८८ वं आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलयं.
या संमेलनासाठी घुमानला जाणाऱ्या दोन्ही विशेष रेल्वे गाड्या वाजत-गाजत रवाना झाल्या. पण, पुणे स्टेशनवर विशेष रेल्वे गाडी चार तास उशिरा आल्यानं साहित्यप्रेमींचा खोळंबा झाला.
दरम्यान, संमेलनासाठी या दोन्ही गाड्यांमध्ये अनेक साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी घुमानला प्रस्थान ठेवलंय. प्रत्येक डब्याला साहित्यिकांचं नाव दिलेलं आहे. वाजतगाजत प्रस्थान ठेवण्यात आलंय.
संमेलनामध्ये प्रदान करण्यात येणाऱ्या सन्मानचिन्हाचं नुकतंच पुण्यात अनावरण करण्यात आलंय. संत नामदेवांचे शिल्प आणि मराठी - पंजाबीचा अनोखा मेळ असणारं हे सन्मान चिन्हाचं भाई वैद्य आणि साहित्यिक ना. म. जोशी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.
दरम्यान, घुमानमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनात पिंपरी चिंचवडचाही आवाज घुमणार आहे. प्राचीन काळातील चौघडा आणि तुतारी च्या वादनानं या संमेलनाची सुरवात केली जाणार आहे... आणि याचा मान मिळालाय पिंपरी चिंचवडच्या पाचंगे कुटुंबाला... हे सम्मेलन पंजाबमध्ये होत असल्यामुळे या वादकांनी आपल्या चोघड्यावर चक्क भांगड्याची चाल बसवण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.