खामगाव आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द होणार

खामगाव आदिवासी आश्रमशाळेतल्या बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली आहे.

Updated: Nov 4, 2016, 08:58 PM IST
खामगाव आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द होणार  title=

बुलडाणा : खामगाव आदिवासी आश्रमशाळेतल्या बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली आहे. तसंच या आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

इतरही विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे, त्यामुळे अजून पाच मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या प्रकरणी आरोपी असलेल्या 10 कर्मचा-यांना निलंबित करण्यात आल्याची माहितीही सावरांनी दिली आहे. तत्पूर्वी सावरा यांची खामगावमध्ये युवका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवली होती. तसंच काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात आला होता.