महाड दुर्घटना : बेपत्ता १५ जणांच्या नातेवाईकांचा धीर सुटला... आणि

महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेच्या आज दहाव्या दिवशीही शोध कार्य सुरूच होते. मात्र दहा दिवसांनंतरही अनेक बेपत्तांचे मृतदेह सापडलेले नसल्यामुळं नातेवाईकांची घालमेल आणखीनच वाढली. 

Updated: Aug 12, 2016, 11:32 PM IST
महाड दुर्घटना : बेपत्ता १५ जणांच्या नातेवाईकांचा धीर सुटला... आणि  title=

महाड : महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेच्या आज दहाव्या दिवशीही शोध कार्य सुरूच होते. मात्र दहा दिवसांनंतरही अनेक बेपत्तांचे मृतदेह सापडलेले नसल्यामुळं नातेवाईकांची घालमेल आणखीनच वाढली. 

काही बेपत्ता प्रवासी आता परतण्याच्या आशा पूर्णपणे मावळल्यानं आणि मृतदेह शोधण्यातही अपयश आल्यामुळं अपघात स्थळाजवळ नातेवाईकांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्यासह बेपत्ता व्यक्तींचे नातेवाईक, प्रशासकीय अधिकारी, उपस्थित होते. 

या अपघातील आतापर्यंत 26 प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र अजून 15 जण बेपत्ताच आहेत. बेपत्ता व्यक्ती परत येईन या आशेपोटी नातेवाईक अपघात स्थाळाजवळ शोधकार्य सुरू असताना ठाण मांडून बसले होते. मात्र दहा दिवसांनंतरही मृतदेह मिळत नसल्यानं नातेवाईकांचा धीर सुटला. 

काल रात्री जिल्हाधिकारी आणि बेपत्ता व्यक्तींचे नातेवाईक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर नातेवाईंकांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आज हे सर्व नातेवाईक श्रद्धाजंली देऊन घरी परतले.