धुळे, नंदूरबारमध्येही पटेल आरक्षणाची मागणी

गुजरातमध्ये मंगळवारी पटेल समाजाच्या आरक्षणासाठी भव्य रॅली पाहिल्यानंतर, महाराष्ट्रातही पटेल समाजाच्या आरक्षणाची मागणी वाढली आहे. धुळे आणि नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील काही भागात पटेल समाज आहे.

Updated: Aug 26, 2015, 05:57 PM IST
धुळे, नंदूरबारमध्येही पटेल आरक्षणाची मागणी title=

धुळे : गुजरातमध्ये मंगळवारी पटेल समाजाच्या आरक्षणासाठी भव्य रॅली पाहिल्यानंतर, महाराष्ट्रातही पटेल समाजाच्या आरक्षणाची मागणी वाढली आहे. धुळे आणि नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील काही भागात पटेल समाज आहे.

हार्दिक पटेल यांच्या रॅलीनंतर महाराष्ट्रातील गुजर समाजानेही आरक्षणाची मागणी करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पाटीदार समाजापैकी धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये लेवा पाटीदार, तसेच गुजर पाटीदार समाज आहे. त्यापैकी पटेल समाजाने आरक्षणाची मागणी करण्याच ठरवले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.