आमदार जयकुमार गोरे यांना अटक

विनयभंग आणि व्हॉट्सऍपवर अश्‍लील पोस्ट टाकल्याच्या गुन्ह्यामध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना सातारा पोलिसानी अटक केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 10, 2017, 08:32 PM IST
आमदार जयकुमार गोरे यांना अटक title=

सातारा : विनयभंग आणि व्हॉट्सऍपवर अश्‍लील पोस्ट टाकल्याच्या गुन्ह्यामध्ये माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना सातारा पोलिसानी अटक केली आहे. सोमवारी यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानेही  फेटाळला होता. 

वॉट्स अॅपवरून अश्‍लील मेसेज पाठवून तसेच शरीरसंबंधांची मागणी करून आमदार जयकुमार गोरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार येथील एका महिलेने शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. 

या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी गोरे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. आमदार जयकुमार गोरे याना अटक झाल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान माझ्या विरोधी राजकीय कारस्थान आहे असे मत आमदार जयकुमार गोरे यानी व्यक्त केले.