नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा केला घात, एक जवान शहीद

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरुच आहे. भामरागड इथं नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात जिल्हा पोलीस दलाचा एक जवान शहीद झालाय.

Updated: May 4, 2017, 01:23 PM IST
नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा केला घात, एक जवान शहीद  title=

गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरुच आहे. भामरागड इथं नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात जिल्हा पोलीस दलाचा एक जवान शहीद झालाय.

सुरेश तेलामी असं या जवानाचं नाव आहे. नक्षलवाद्यांनी जवानांची 2 बुलेटप्रूफ गाड्या उडवल्यात. भुसुरुंग स्फोट घडवत नक्षल्यांनी हे कृत्य घडवलंय.

यात 19 जवान जखमी झाल्याचं वृत्त समोर येतंय. जखमींना तात्काळ रायपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. 

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर बस्तरचा दौरा करणार आहेत.