कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : ५०० आणि हजाराच्या नोटानंतर मोदी सरकारन सोन्यावर सर्जिकल स्ट्राईक केलाय.. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या तरी पिंपरी चिंचवड मधल्या एका स्थानिक भाजप नेत्याची मात्र चांगलीच गोची झालीय.
पिंपरी चिंचवडच्या भोसरी मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राहुल सस्ते यांचा भाजप मध्ये प्रवेश झाला.
मूळचे उद्योजक पण आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधून भाजपच्या तिकिटावर उमेदवारी मिळवण्यासाठी सस्ते इच्छूक आहेत..!
उद्योजक आणि भाजप कडून इच्छूक उमेदवार एवढीच त्यांची ओळख नाही.तर ते गोल्डमॅन ही आहेत.