तळकोकणात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी

तळकोकणात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कणकवली, मालवण परिसरात तब्बल पाच-सहा तास मुसळधार पाऊस झाला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 15, 2017, 08:53 PM IST
 तळकोकणात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी title=

सिंधुदूर्ग : तळकोकणात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कणकवली, मालवण परिसरात तब्बल पाच-सहा तास मुसळधार पाऊस झाला आहे. झाडं उन्मळुन पडण्याच्या घटना काही ठिकाणी घडल्यात. तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. 

उन्हाच्या काहिलीनं त्रस्त झालेल्या नागरिकांना त्यामुळं काहिसा दिलासा मिळाला असला तरी आंब्याचं मात्र नुकसान होणार आहे. दरम्यान मान्सून या वर्षी लवकर येण्याचा अंदाज आहे. अंदमान निकोबारमध्ये लवकरच मान्सून दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.