रायगड किल्ल्यावरील दगड डोक्यात पडून पुणेकराचा मृत्यू

रायगड किल्ल्याच्या पाय-या उतरत असताना कड्यावरुन सुटलेला दगड पडून, अठ्ठेचाळीस वर्षांचे पर्यटक लक्ष्मण उबे यांचा मृत्यू झाला. ते पुण्यातल्या कोथरुड भागात राहत होते. 

Updated: Oct 26, 2015, 06:45 PM IST
रायगड किल्ल्यावरील दगड डोक्यात पडून पुणेकराचा मृत्यू title=

रायगड : रायगड किल्ल्याच्या पाय-या उतरत असताना कड्यावरुन सुटलेला दगड पडून, अठ्ठेचाळीस वर्षांचे पर्यटक लक्ष्मण उबे यांचा मृत्यू झाला. ते पुण्यातल्या कोथरुड भागात राहत होते. 

रविवार संध्याकाळची ही घटना आहे. किल्ले रायगडावर येणाऱ्या पर्यटकांकडून पुरातत्व खातं फी आकारतं. मात्र सुविधा कसल्याच मिळत नसल्याची ओरड आहे. कड्यांवर जाळी बसवली तर ही दुर्घटना टळू शकली असती. 

रायगड किल्ल्याची डागडुजीच करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. आता या घटनेनंतर तरी प्रशासनाचं याकडे लक्ष जाणार आहे का असा प्रश्न विचारला जातोय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.