मंगळसूत्र विकून घरात शौचालय उभारणाऱ्या सूनेची सासू उघड्यावर

मंगळसूत्र विकून घरात शौचालय उभारणाऱ्या संगीता आव्हाळे यांच्या सासूला, शुक्रवारी वाशिम जिल्हा परिषदेच्या 'गुड मॉर्निंग' पथकानं उघड्यावर शौचाला जाताना पकडलं. 

Updated: Dec 26, 2015, 10:47 PM IST
मंगळसूत्र विकून घरात शौचालय उभारणाऱ्या सूनेची सासू उघड्यावर title=

वाशिम : मंगळसूत्र विकून घरात शौचालय उभारणाऱ्या संगीता आव्हाळे यांच्या सासूला, शुक्रवारी वाशिम जिल्हा परिषदेच्या 'गुड मॉर्निंग' पथकानं उघड्यावर शौचाला जाताना पकडलं. 

आपलं मंगळसूत्र विकून घरात शौचालय उभारणाऱ्या वाशिम जिल्ह्यातल्या सायखेड गावातल्या संगीता आव्हाळे, राज्यभरात प्रसिद्ध पावल्या होत्या. स्वच्छतेबाबत जागरुक संगीता आव्हाळे यांची राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यावेळी स्वतः भेट घेऊन, त्यांना मंगळसूत्र भेट देत त्यांचा सत्कार केला होता. 

यासाठी संगीता आव्हाळे यांना काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारनं 'राज्य स्वच्छतादूत' घोषित केलं होतं. मात्र याच संगीता आव्हाळे यांच्या सासूला, शुक्रवारी वाशिम जिल्हा परिषदेच्या 'गुड मॉर्निंग' पथकानं उघड्यावर शौचाला जाताना पकडलं. 

वाशिम जिल्ह्यात सध्या 'गुड मॉर्निंग' पथकानं उघड्यावर शौचाला जाणा-या लोकांविरुद्ध धडक मोहीम सुरु केलीय. या मोहिमेंतर्गत पथकानं संगीता यांच्या सासूला यावेळी समज देऊन सोडलं. या घटनेवेळी संगीता आव्हाळे माहेरी होत्या, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान गावात स्वच्छता अभियान उत्तमप्रकारे सुरु असल्याचा दावा संगीताच्या पतीने केलाय.