पनवेल : जर्मनीत २९ जुलै ४ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या कार रेसिंगच्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व नवीन पनवेलमधील पिल्लई कॉलेजचे विद्यार्थी करणार आहेत.
पिल्लई कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांनी एच.आर.टी २०१ ही रेसींग कार तयार केली आहे. ७५७ सीसीची ही कार असून अडीच टन वजन आहे. सात ते आठ महिन्यात दहा लाखांचा खर्च करून ही कार तयार करण्यात आली आहे.
सोसायटी ऑफ ऑटोमेटीव्ह संस्थेने आयोजित केलेल्या या जगभरातील एकूण ७२ संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे युरोपीअन ट्रॅकवर आता भारतीय रेसिंग कार धावण्यास सज्ज आहे.
विद्यार्थ्यांन मध्ये असलेल्या गुणामुळे ही कार बनवली गेली, महाविद्यालयाने त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केले असल्याचे महावीद्यालयाचे ट्रस्टी प्रियम पिल्लई यांनी सागितले.
अतिशय वेगाने धावणारी ही कार जर्मनच्या स्पर्धेत आपली छाप नक्की उमटवेल असा विश्वास या विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांनी व्यक्त केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.