अंतराची हत्या एकतर्फी प्रेमातून...!

'सॉफ्टवेअर' अभियंता अंतरा दास खूनप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अंतराच्या सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या मित्राला बुधवारी रात्री उशिरा अटक केली. तर, त्याच्या 2 साथीदारांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संतोषकुमार अखिलेशप्रसाद गुप्ता असं अटक केलेल्या २४ वर्षीय आरोपीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झालंय...त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय...!

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 29, 2016, 06:54 PM IST
अंतराची हत्या एकतर्फी प्रेमातून...! title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : 'सॉफ्टवेअर' अभियंता अंतरा दास खूनप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अंतराच्या सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या मित्राला बुधवारी रात्री उशिरा अटक केली. तर, त्याच्या 2 साथीदारांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संतोषकुमार अखिलेशप्रसाद गुप्ता असं अटक केलेल्या २४ वर्षीय आरोपीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झालंय...त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय...!

 पिंपरी चिंचवड च्या एका प्रसिद्ध आय टी कंपनीत काम करणाऱ्या अंतरा दास या २३ वर्षीय तरुणीचा गेल्या शुक्रवारी रात्री हत्या करण्यात आली होती. त्या हत्येनं एकच खळबळ उडाली होती. या हत्येचा उलगडा करण्यात देहू रॉड पोलिसांना यश आलंय. 
 
 अंतराच्या हत्येचा सूत्रधार तीचा मित्रच असल्याचं स्पष्ट झालंय... संतोषकुमार अखिलेशप्रसाद गुप्ता असं त्याच नावं आहे. संतोष हा मूळचा बिहारचा असून तो बंगळुरु मध्ये आयटी कंपनीत नोकरी करतो. अंतरा बंगळुरू मध्ये ट्रेनिंगला असताना तिची संतोषशी ओळख झाली होती. त्यावेळी संतोषने तिला मदत केली होती. 
 
 तो गेल्या 11 महिन्यापासून तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तसेच तो अंतराकडे लग्न करण्याची मागणी करत होता. तिच्या मोबाईवलर संदेश पाठवून लग्न करण्याची मागणी करत होता. अंतरा लग्न करण्यास तयार नव्हती. 
 
 अंतराने वेळोवेळी संतोषचा मोबाईल क्रमांक 'ब्लॉक' केला होता. तसेच अंतरा पुण्यात कोणासोबात फिरत आहे. तिच्यावर लक्ष ठेवण्याचे त्याने मित्रांना सांगितले होते. अंतरा कसलाही लग्नाला प्रतिसाद देत नसल्यामुळं संतोषकुमारनेच त्याच्या हत्येचा कट रचल्याचा समोर आलंय... 

हत्येच्या वेळी संतोषकुमार बेंगलोर मध्ये असल्याचा दावा करतोय. त्यामुळं त्याने अंतराच्या हत्येसाठी कोणाला सुपारी दिली होती का त्याला कोणी मदत केली याचा देहू रॉड पोलिस तपस करत आहेत...पोलिसांनी आणखी दोन आरोपीना ताब्यात घेतल आहे. दरम्यान संतोषकुमारला न्यायालयात हजर केलं असता त्याला ८ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय...!