मुंबई : पत्रकाराला केलेल्या दमदाटीप्रकरणी अखेर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. महाडमध्ये पुलाची दुर्घटना झाल्यानंतर रायगडचे पालकमंत्री असलेल्या प्रकाश मेहतांनी प्रश्न विचारणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर संतापले. प्रकाश मेहतांनी आरडाओरडा करून या पत्रकाराला दमदाटी केली.
महाडमध्ये पुलाची दुर्घटना झाल्यानंतर रायगडचे पालकमंत्री चांगलेच वादात अडकलेत. मुख्यमंत्री महाडमध्ये कोसळलेल्या पुलाची पाहणी करत असताना रायगडचे पालकमंत्री म्हणून मिरवणारे प्रकाश मेहता मागे उभे राहून चक्क सेल्फी काढत होते.