पुणे : वादात सापडलेल्या पुण्यातल्या सनबर्न पार्टीच्या अडचणी आणखीनं वाढल्या आहेत. पुणे जिल्हाधिका-यांनी सनबर्नच्या आयोजकांना झटका दिला आहे. आयोजकांना 12 प्रकारच्या एनओसी सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयानं दिले आहेत.
एनओसी सादर केल्यानंतरच सनबर्न फेस्टीव्हलला परवानगी देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. आयोजकांनी करमणूक कर भरताना तिकीट विक्रीची माहिती दिलेली नसल्याचा ठपका जिल्हाधिका-यांनी ठेवला आहे. त्यामुळं सनबर्नच्या आयोजकांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. सनबर्नच्या आयोजकांनी 27 लाखांचा करमणूक कर भरलाय. मात्र किती तिकीट विक्री करणार याची माहीतीच दिलेली नाही. त्यामुळं तिकीट विक्रीची माहिती देण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.