‘ऐ दिल है मुश्किल’ विरोधात संभाजी ब्रिगेडचे निदर्शने

‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला विरोध करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर निदर्शने केली. यावेळी पाकिस्तानविरोधात  घोषणाबाजी देत कार्यकर्त्यांनी या चित्रपटाला विरोध केला.

Updated: Oct 28, 2016, 02:15 PM IST
 ‘ऐ दिल है मुश्किल’ विरोधात संभाजी ब्रिगेडचे निदर्शने

कल्याण : ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला विरोध करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर निदर्शने केली. यावेळी पाकिस्तानविरोधात  घोषणाबाजी देत कार्यकर्त्यांनी या चित्रपटाला विरोध केला.

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने काम केले आहे. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करु देणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली होती. चित्रपट प्रदर्शित केल्यास ‘फटाके’ फुटतील असा इशाराच मनसेने दिला होता.

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर मनसेचा विरोध मावळला. करण जोहर यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर ‘ऐ दिल है मुश्किल’ प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला.