सांगली: एकीकडे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील एका बाळंतीणीच्या शोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बेडग गावातील अंजली राजेंद्र माळी या महिलेला दुसरी पण मुलगीच झाली म्हणून, तिचा पती आणि सासूनं तीन दिवस उपाशी पोटी खोलीत 'कोंडून' घालून मारहाण केली. अंजली, अडीज वर्षाची पहिली मुलगी आणि तीन महिन्याचं बाळ केवळ पाणी पिऊन राहिले.
हा प्रकार ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं अंजलीची सुटका केली. पोलिसांची चाहूल लागताच पती राजेंद्र आणि सासू अनुसया माळी हे पळून गेले. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अंजलीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.