मदरशांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

राज्यातील मदरशांना १० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. आता मदरशांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्वृत्ती देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 4, 2013, 11:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातील मदरशांना १० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. आता मदरशांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्वृत्ती देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यात जवळपास १,८८९ मदरसे असून, मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत मदरशांमधील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती मदरशांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी, धार्मिक शिक्षणाबरोबर शासनमान्य शाळांत माध्यमिक शिक्षणासाठी नववी, दहावी, अकरावी, बारावीला २०१३-१४ पासून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळेल. यानुसार नववी आणि दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी चार हजार रुपये आणि अकरावी, बारावी आणि आयटीआयसाठी पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती किमान 75 टक्के असणे आवश्याक आहे.
या शिष्यवृत्तीचा लाभ सुरूवातीला राज्यातील एक हजार विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यात नववी आणि दहावीत शिकणारे ६०० विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालय, आयटीआयमध्ये शिकणारे ४०० विद्यार्थी अशी विभागणी केली आहे. शिष्यवृत्तीसाठी यादी तयार करताना ती पालकांच्या उत्पन्नाच्या चढत्या क्रमाने करण्यात येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.