तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान

आजपासून महाराष्ट्राच्या आसंमतात उंचावलेले दिसतील त्या दिंडी पताका आणि कानावर पडतील ते जय जय राम कृष्ण हरीचे बोल. देहु नगरीतून संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान ठेवले. तुकोबा तुकोबा विठोबा विठोबाच्या जयघोषात वैष्णवांची इंद्रायणी आता चंद्रभागेच्या ओढीने निघाली आहे. नदी ज्या प्रमाणे सागराला मिळते त्याप्रमाणे विठ्ठल भक्तीन लीन झालेला वैष्ण वारीच्या माध्यमातून पंढरपुरात पांडूरगाशी एकरूप होतो. 

Updated: Jun 27, 2016, 11:16 PM IST
तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान title=

पुणे : आजपासून महाराष्ट्राच्या आसंमतात उंचावलेले दिसतील त्या दिंडी पताका आणि कानावर पडतील ते जय जय राम कृष्ण हरीचे बोल. देहु नगरीतून संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान ठेवले. तुकोबा तुकोबा विठोबा विठोबाच्या जयघोषात वैष्णवांची इंद्रायणी आता चंद्रभागेच्या ओढीने निघाली आहे. नदी ज्या प्रमाणे सागराला मिळते त्याप्रमाणे विठ्ठल भक्तीन लीन झालेला वैष्ण वारीच्या माध्यमातून पंढरपुरात पांडूरगाशी एकरूप होतो. 

महाराष्ट्रात वारी म्हणजे एक प्रचंड मोठा आध्यात्मिक सोहळा झालाय. भक्तीच मूर्त रूप म्हणजे विठ्ठल आणि आर्त रूप म्हणजे वारी... जीवनाच सासर म्हणजे वास्तविक जीवन तर माहेर म्हणजे विठोबा... म्हणूनच पंढरीच वर्णन माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी अस केल जात... महाराष्ट्राच्या जीवनाला नैकतीच अधिष्ठान देणारा हा सोहळा. संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानं सुरु झाला. दिवसभर मंदिराच्या परिसरात तुकोबा- तुकोबा नामाचा जयघोष सुरु होता.

अवघी देहू नगरी विठ्ठल मय झाली. महापुजेनंतर अवघ्या महाराष्ट्राचा भक्तीरंग आनंदात न्हायला आहे अशी भावना मुनगंटीवार यांनी दिली. आषाढवारीसाठी जगदगुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीनं देहुतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं.  सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी दरवर्षी संत तुकाराम महाराजांची पालखी ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला देहुतल्या मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. पालखीचा पहिला मुक्काम देहुगाव इथल्या इनामदारवाड्यात आहे. पालखी बुधवारी 29 तारखेला पुण्यात मुक्कामी असणार आहे. पालखी 15 जुलैला पंढरपूरला पोहाचणार असून 19 जुलैला पालखीचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे.