पंढरपूर : व्हाट्सअॅपवर सोलापुरात अफवा पसरविणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गावात चोर शिरले आहेत, असा मेसेज व्हाट्सअॅपवरुन दहा जणांना व्हायरल केला होता. ग्रुप अॅडमिनसह या सर्वांना पोलिसांनी अटक केली.
गेल्या पंधरा दिवसांपासून अफवा पसरविण्यात येत होत्या. सोलापूर जिल्ह्यातील चोर शिरल्याच्या अफवांनी घबराटीचे वातावरण होते. परराज्यातून टोळी राज्यात घुसली आहे. तुम्ही सावधान राहा, असा मेसेज पसरविण्यात येत होता. पोलिसांनी या मेसेजबाबत अनेकवेळा खुलासे केलेत. मात्र, अफवाचे लोन कमी होत नव्हते.
त्यामुळे पोलिसांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या अफवा सोशल मीडियातून पसरवल्या जात असल्याचे लक्षात आले. पंढरपूर तालुक्यातील आनवली व गोपाळपूर परिसरात अर्ध्या तासात असे मेसेजद्वारे अफवा पसरविणारे आणि ते मेसेज फॉरवर्ड करणारे १० तरुण आढळले. यावर पाळत ठेवून सोमवारी रात्री अफवा पसरविणाऱ्या १० तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
मेसेजद्वारे अफवा पसरविणारे आणि ते मेसेज फॉरवर्ड करणारे १० तरुण आढळले. त्यानंतर पोलिसांनी मेसेज पाठवणाऱ्या ग्रुप अॅडमिन आणि फॉरवर्ड करणाऱ्या १० तरुणांवर गुन्हा दाखल केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.