नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्याची घोषणा केल्यानंतर बँक आणि एटीएमबाहेर लोकांच्या मोठमोठ्या रांगा पाहायला मिळतायत.
मोदींच्या निर्णयामुळे अनेक तास रांगेत उभे राहावे लागत असले तरी अनेकांनी याला पाठिंबा दर्शवलाय. रांगेत उभे राहण्यावरुन सोशल मीडियावर अनेक जोक्सही फिरतायत.
नोटाबंदीदरम्यान नाशिकमध्ये अशी एक घटना घडलीये जी जोक म्हणून ऐकायला छान आहे मात्र ती जोक नसून खरी घटना आहे. नाशिकमधील सातपूर येथील एका बँकेच्या बाहेर रांगेत उभ्या असलेल्या एका तरुणीला तब्बल 5 वर्षांनी तिचा प्रियकर दिसला.
बॉयफ्रेंड फसवल्याचा राग तिच्या मनात 5 वर्षानंतरही कायम होता. त्याला रांगेत उभा असलेला पाहताच त्या तरुणीने आपल्या घरच्यांना तेथे बोलवले. त्यानंतर तरुणीच्या घरच्यांनी त्या तरुणाला बेदम चोप दिला.