पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी आज पहिल्यांदाच भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून विराजमान होणार आहे. हा मान भाजपच्या मुक्ता टिळक यांना मिळणार आहे, कारण पुण्याच्या महापौरपदी मुक्ता टिळक यांची निवड निश्चित मानली जात आहे.
भाजपकडून मुक्ता टिळक यांना महापौरपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीही महापौरपदाच्या निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत.
महापालिका निवडणुकीत पुण्याला स्पष्ट बहुमत मिळाल्याने, भाजपचा महापौर आणि उपमहापौर विराजमान होणार आहे. पुण्यातील १६२ नगरसेवकांपैकी ९८ नगरसेवक निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादीला ४०, काँग्रेसला ११, शिवसेनेला १० आणि मनसेला ०२ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.