www.24taas.com, मुंबई
शिवसेनेच्या मिलिंद वैद्यांनी पक्षाचा दादरमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत पक्षाच्या विभागप्रमुखपदाचा आहे.
शिवसेनेच्या दादर बालेकिल्ल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व जागा जिंकत सेनेला मोठा हादरा दिला. मिलिंद वैद्यांनाही महापालिका निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.
शिवसेनेचा बालेकिल्ला असणा-या दादर-माहीम परिसरातच शिवसेनेचं पानिपत झाल्यानं पक्षनेतृत्व कमालीचं नाराज झालं. आणि या नाराजीचा फटका विभागप्रमुख मिलिंद वैद्य यांना बसला. त्यामुळेच वैद्य यांना पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिलाय.
मिलिंद वैद्य हे शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे जोशी यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. सुरुवातीपासूनच स्थानिक सेना कार्यकर्त्यांनी मनोहर जोशी यांच्यावर तिकीटावाटपावरून अनेक गंभीर आरोप केले होते. मनोहर जोशींचे खास करून राज ठाकरेंशी असलेले व्यावसायिक संबंध आहेत...आणि त्यामुळेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फायदेशीर ठरतील असेच उमेदवार शिवसेनेने दादर-माहीम परिसरात शिवसेना नेते मनोहर जोशींनी उभे केले..अशी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे... आणि विशेष म्हणजे मिलिंद वैद्य माहीममधून यांचाही पराभव झाला....