आयपीएलवर सट्टा, चार बुकींना अटक

आय़पीएलवर सट्टा लावणा-या चौघांना अटक करण्यात आलीये. हे चारही बुकी असून त्यांनी श्रीलंकन खेळाडूंना पैसे दिल्याचा संशय आहे असा दावा एका इंग्रजी दैनिकानं केलाय. मुंबईच्या लोखंडवाला भागातून या बुकींना अटक करण्यात आली आहे.. या सट्टोखोरांच्या अटकेनं भारतीय खेळांडूवरही संशयाची सुई वळलीय. दरम्यान, या टोळीतील दाऊद टोळीतील छोटा शकीलशी संबंध होता, अशी माहिती आता पुढे आली आहे.

Updated: May 19, 2012, 11:38 AM IST

www.24taa.com, मुंबई

आय़पीएलवर सट्टा लावणा-या चौघांना अटक करण्यात आलीये. हे चारही बुकी असून त्यांनी श्रीलंकन खेळाडूंना पैसे दिल्याचा संशय आहे असा दावा एका इंग्रजी दैनिकानं केलाय. मुंबईच्या लोखंडवाला भागातून या बुकींना अटक करण्यात आली आहे.. या सट्टोखोरांच्या अटकेनं भारतीय खेळांडूवरही संशयाची सुई वळलीय. दरम्यान, या टोळीतील दाऊद टोळीतील  छोटा शकीलशी संबंध होता, अशी माहिती आता पुढे आली आहे.

आयपीएल नाट्याने देशभरात खळबळ उडवून दिली असताना आणखी एका प्रकरणातून मॅच फिक्सिंगचा आरोप करण्‍यात आला आहे. आयपीएलमध्‍ये सामना फिक्‍स करण्‍यासाठी श्रीलंकेच्‍या एका खेळाडूला दहा कोटी रुपये दिले होते, असा खळबळजनक खुलासा सोनू जालान नावाच्‍या बुकीने केला आहे. मॅच फिक्सिंगमध्‍ये काही भारतीय खेळाडुही सहभागी असल्‍याचा दावाही त्‍याने केला आहे. या प्रकरणामुळे आयपीएल नाट्याला नवे वळण मिळण्‍याची शक्‍यता आहे.

सोनूला मुंबईच्‍या गुन्‍हे शाखेने अटक केली. त्‍याच्‍यासोबत देवेंद्र कोठारी उर्फ भैय्याजी यालाही ताब्‍यात घेतले होते. दोघांना लोखंडवाला कॉम्‍प्‍लेक्‍समधून अटक करण्‍यात आली होती. त्‍यांच्‍याकडून दोन लॅपटॉप, व्‍हाईस रेकॉर्डर, २५  मोबाईल फोन आणि ५.१८  लाख रुपये रोख जप्‍त करण्‍यात आले.

या टोळीतील दाऊद टोळीतील  छोटा शकीलशी संबंध होता, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून उघड झाली आहे. सट्टा लावणारे दोघे  हे दोघेही पाकिस्‍तानातील सुमारे ५००  कोटी रुपयांच्‍या एका सट्टा नेटवर्कला जुळलेले आहेत. छोटा शकील गँग हे नेटवर्क चालविते. त्‍यांचे ग्राहक पाकिस्‍तान, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्‍तान या ठिकाणी आहेत. भारतात दिल्‍ली, कोलकाता, राजस्‍थान, मुंबई, गुजरात आणि हरियाणा या‍ ठिकाणी त्‍यांचे जाळे पसरलेले आहे. वेबसाईटच्‍या माध्‍यमातून बेटींग केली जात होती, अशी माहिती पुढे येत आहे.