मुंबईचे डबेवाले ही मुंबई महानगराची एक प्रमुख ओळख मानण्यात येते. उन, वारा, पाऊस, गर्दी यांची तमा न बाळगता अगदी वेळवर घरचं जेवण असंख्य मुंबईकरां पर्यंत पोहचतं ते याच मंडळींच्या अथक परिश्रमामुळे...दररोज इतक्या लोकांचे डब कोणताही गोंधळ होऊ न देता ते पोहचवतात हा एकप्रकारचा चमत्कार आहे.
आजकाल जेवणाच्या डब्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी पोहचवण्याची सेवाही ते देतात. रोज सकाळी ऑफिसला पोहचायच्या गडबडीत अनेक मुंबईकर मोबाईल फोन घरी विसरुन येतात ते पोहचवण्याचं काम देखील ही मंडळी करतात. त्या व्यतिरिक्त ऑफिसमध्ये अचानक एकादी महत्वाची फाईलची गरज भासल्यास तीही ते पोहचती करतात. हे तर काहीच नाही आजकाल फूलणारया प्रेमाचे संदेश असलेली पत्र, सुंगधी भेटकार्ड आणि भेटवस्तू जेवणाच्या डब्यासोबत ते पोहतवात.
नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोशिएशनचे सचिव किरण गावंडे म्हणाले की अनेकदा गृहिणी सेलफोन किंवा पैसे तसंच पाकिट पोहचवण्याची विनंती करतात. खरतरं डबा चार पाच जणांच्या हातून पोहचता केला जात असल्याने आम्ही याला फारशी तयारी दाखवत नाही पण घक आणि ऑफिसमध्ये अंतर खुप असल्याने आम्ही विनंती नाकारत नाही असंही ते म्हणाले.
मुंबईच्या डबेवाल्यांना तब्बल १२० वर्षांचा इतिहास आणि दररोज दोन लाख मुंबईकरांच्या जेवणाचे डबे पोहचवण्याची अवाढव्य व्यवस्था इतकी वर्षे ५००० अल्पशिक्षीत डबेवाले सांभाळतात. त्यामुळेच जगप्रसिध्द हारवर्ड बिझिनेस स्कूलने मुंबईच्या डबेवाल्यांची केसस्टडीचा समावेश आपल्या अभ्यासक्रमात केला आहे.