www.24taas.com, मुंबई
मध्य रेल्वेच्या काल झालेल्या सिग्नल यंत्रणेला आग लागल्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती, ती पूर्ववर्त होण्यासाठी जवळजवळ तीन दिवस लागणारं आहेत. आजही मध्य रेल्वेचा खेळखंडोबा हा सुरूच आहे. आजही मध्य रेल्वे अत्यंत धिम्या गतीने धावत आहे. लोकल ट्रेन ह्या जवळजवळ ३० ते ४० मिनिटे उशीराने धावत आहे, त्यामुळे आज पुन्हा एकदा चाकरमान्यांना हाल सोसावे लागत आहे.
कुर्ला ते सीएसटी दरम्यान सिग्नल व्यवस्था अजूनही व्यवस्थित झाली नसल्याने पुढील काहीवेळ तरी अशी रेल्वेसेवा विस्कळीत राहणार आहे. तर डाऊन मार्गावरील सिग्नल यंत्रणा सुरळीत झाली आहे. पण अप मार्गावर मात्र रेल्वे उशीराच आहे, आज जवळजवळ ८० टक्के गाड्या ह्या सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना हाल सोसावे लागत आहे. काल अनेकांनी ६ ते ७ तास मुंबईकडे जाण्यासाठी प्रवास केला होता, तर आजही या प्रवासाला जवळजवळ एक तास जास्तच प्रवास करावा लागणार आहे
मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वेस्थानकाजवळच्या सिग्नल नियंत्रण केबीनला रात्री सव्वाबाराच्या सुमारास आग लागल्यामुळे मध्य, हार्बरची रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवाशांना प्रचंड त्रास झाला होता . दरम्यान, सिग्नल यंत्रणा दुरूस्त होण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे मुंबईकरांना चार दिवस उशिरा रेल्वेचा प्रवास करावा लागणार आहे.