रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर अनिवार्य

रिक्षांना इलेक्ट्रनिक मीटर बसवावेच लागतील, या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टानंही शिक्कामोर्तब केलय. याबाबत रिक्षाचालक संघटनांनी केलेली याचिका युप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय. तसंच मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयावरही कोर्टानं शिक्कामोर्तब केलंय.

Updated: Apr 13, 2012, 07:44 PM IST

www.24taas.com, मुंबई

रिक्षांना इलेक्ट्रनिक मीटर बसवावेच लागतील, या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टानंही शिक्कामोर्तब केलय. याबाबत रिक्षाचालक संघटनांनी केलेली याचिका युप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय. तसंच मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयावरही कोर्टानं शिक्कामोर्तब केलंय.

रिक्षांना इलेक्ट्रनिक मीटर सक्तीचे करावे असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, त्याविरोधात गेल्या महिन्यात रिक्षा संघटनांनी मुंबई हाकोर्टात धाव घेतली होती, मात्र रिक्षांना इलेक्ट्रामीटर सक्तीचेच असल्याचा हायकोर्टानंही दिला होता. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात गेलेल्या रिक्षाचालकांच्या पदरी तिथंही निराशाच पडली आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी शहरांबरोबरच संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रनिक मीटर बसवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यानुसार एक मार्चपासून मुंबई परिसरात नव्या रिक्षांना तर एक एप्रिलपासून जुन्या रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती असणार आहे. त्याला रिक्षाचालकांचा विरोध आहे. दरम्यान भाडेवाढीच्या मागणीसाठी संपावर जाण्याच्या भूमिकेवर रिक्षा संघटना ठाम आहेत. त्यामुळे रविवारी रात्रीपासूनचा रिक्षांचा संप अटळ मानण्यात येतोय.