बीकेसीत अपघात, दोन तरुणी ठार

बीकेसी भागात एका अपघातात दोन तरुणींना जीव गमवावा लागला.  एका डबल डेकर बसनं स्कूटीला धडक दिली. 

Updated: Jun 28, 2015, 11:29 AM IST
बीकेसीत अपघात, दोन तरुणी ठार title=

मुंबई  : बीकेसी भागात एका अपघातात दोन तरुणींना जीव गमवावा लागला.  एका डबल डेकर बसनं स्कूटीला धडक दिली. 

या अपघातात स्कूटीवरील टीना मोटनी आणि संध्या कोठारी या दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या. सायन हॉस्पटीलमध्ये नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. भरधाव डबल डेकर बस बांद्रा इथून कुर्ला रेल्वे स्टेशन इथं जात होती. 

एका वळणावर बसने पाठीमागून स्कूटीला धडक दिली.  अपघातानंतर बस ड्रायव्हरनं घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. नवदेव आनंद असं ड्रायव्हरचं नाव आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.