२ हजाराची नोट देऊ शकते धोका....

 ही बातमी दाखवून तुम्हांला सतर्क करण्याचा आमचा उद्देश आहे.  दोन हजार रुपयांची नोट मिळविण्यासाठी तुम्ही बँकेबाहेर लांब रांगेत उभे असाल. 

Updated: Nov 17, 2016, 10:46 PM IST
 २ हजाराची नोट देऊ शकते धोका.... title=

मुंबई :  ही बातमी दाखवून तुम्हांला सतर्क करण्याचा आमचा उद्देश आहे.  दोन हजार रुपयांची नोट मिळविण्यासाठी तुम्ही बँकेबाहेर लांब रांगेत उभे असाल. 

पण पुढच्यावेळी तुमच्या हातात २ हजार रुपयांची नोट मिळाली. तर थोडे सावधान राहा. कारण कोणीही खूप सहजपणे तुमच्या हातात नोटेची कलर झेरॉक्स देऊ शकतं. 

आमच्याकडे दोन नोटा आहे त्यातील एक खरी आहे आणि एक झेरॉक्स आहे. या दोन्ही नोटांचा सिरिअल नंबर एकच आहे. 

कशी ओळखाल खरी नोट 

1. नोट लाईटच्या खाली धरल्यास त्याला ४५ डिग्रीच्या अँगलने पाहिल्यास 2000 चा आकडा दिसेल.

२. देवनागरी भाषेत 2000 चा आकडा आहे.

4. मध्यभागी महात्मा गांधींचा फोटो आहे.

5. छोटे-छोटे अक्षरात RBI आणि 2000 लिहिले आहे. 

6. सिक्योरिटी थ्रीडवर भारत, RBI आणि 2000 लिहिलं आहे. त्याला थोडं माडून पाहिल्यास थ्रीडचा रंग निळा दिसेल.

7. गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरचे हस्ताक्षर, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो डाव्या बाजुला आहे.

8. महात्मा गांधींच्या फोटोवर इलेक्ट्रोटाइप (2000)चा वॉटरमार्क आहे.