मुंबई पोलिसातील आणखी एक अधिकारी राजकारणात

माजी मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी राजकारणाची वाट धरल्यानंतर, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आणखी एक अधिकारी राजकारणात उतरणार असल्याचे संकेत मिळतायत.

Updated: Feb 22, 2014, 11:54 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
माजी मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी राजकारणाची वाट धरल्यानंतर, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आणखी एक अधिकारी राजकारणात उतरणार असल्याचे संकेत मिळतायत.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पी के जैन यांच्या निवृत्तीला जेमतेम एक आठवडा अवकाश आहे. याआधीच पी के जैन आपला राजीनामा सोपवला आहे. या तडकाफडकी राजीनाम्याच्या बातमीवरून सर्वच अवाक झाले आहेत.
पी के जैन यांना आपण तडकाफडकी राजीनामा का दिला?, असं विचारलं असता, आपला राजीनामा हा व्यक्तिगत कारणांसाठी आहे. आपण आपला राजीनामा पोलिस महासंचालक आणि राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांना पाठवला आहे.
अनेक दिवसांपासून आपल्या मनात असलेला विचार आता कृतीत आणण्याची वेळ आली असल्याचे सांगून, पी के जैन यांनी खाकीकडून खादीकडे जाण्याचे संकेत दिले आहेत.
जैन आपल्या राजीनाम्याबद्दल अजुनही स्पष्ट बोलत नसल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई पोलिस आयुक्त म्हणून कुणाची नेमणूक करता येईल, या सुंदोपसुंदीत राज्यातील ८० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या, जैन आयपीएस अधिकाऱ्यांच्या असोसिएशनचे सचिव होते.
या राजीनाम्याला राजकीय किनार असल्याचं सांगण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.