www.24taas.com, मुंबई
आधारकार्ड ही भारतीय नागरिकत्वाची एक महत्वाची ओळख बनू लागण्या आगोदरच त्यातही बनवा बनवी होऊ लागल्याचं गोवंडीमध्ये लक्षात आलं. सर्व सरकारी योजनांसाठी आवस्यक असणारं आधार कार्ड एक बांगलादेशी घुसखोरांकडेही असल्याचंही दिसून आलंय.
गोवंडी शिवाजी नगर परिसरामध्ये १४ पुरूष, ६ महिला आणि आठ मुलांकडे आधार कार्ड असल्याचं दिसून आलं. त्यांच्या बांगलादेशी असण्याचे पुरावेही मिळाले. यामुळे सरकारी कारभारावर प्रश्नचिन्हंच उभं राहिलं आहे. यातील काही बांगला देशींकडे पॅन कार्ड आणि रेशन कार्डंही आढळून आली.
अख्तर निजामुद्दिन शेख नामक बांगलादेशी इसमाकडे भारतीय नागरिकत्वाचा महत्वाचा पुरावा मानलं जाणारं आधार कार्ड आढळलं. त्याने हे ओळखपत्र दाखवल्यामुळे कारवाई करण्यास आलेले पोलीसही आधी चक्रावून गेले होते. मात्र तपासणी अंती ते बांगलादेशी असल्याचं सिद्ध झालं.