मुंबई : सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय टप्प्या-टप्प्यानं शिवसेनेत प्रवेश करत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला. आज आणखी एका कार्यकर्त्यांने सेनेत प्रवेश केला.
भुजबळ यांचे निकटवर्तीय राजेंद्र गावित यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. आधी 14 जुलैला समता परिषदेचे नेते किसन कन्हेरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माजी नगरसेवक मंगेश बनसोडे यांनीदेखील 17 जुलै रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता.
कन्हेरे आणि बनसोडेंपाठोपाठ आज राजेंद्र गावित यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. सेनेत आता इनकमिंग सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.