मुंबई : मुंबईच्या सायन रूग्णालयात एका दोन वर्षीय बालकावर नुकतीच अत्यंत दुर्मिळ अशी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलीय. या बालकाला जन्मताच तीन लिंगं होती. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तीन लिंग असलेल्या केसची नोंद झालीय.
उत्तर प्रदेशच्या एका खेड्यात या बालकाचा जन्म झाला होता. त्याला जन्मतःच तीन लिंगं होती. यापूर्वी दोन लिंग असलेल्या केसेस देशात आढळल्या होत्या. मात्र, तीन लिंग असलेल्या बालकाची भारतातली ही पहिलीच घटना...
यूपीतल्या डॉक्टरांनी हात टेकल्यानंतर ती केस सायन हॉस्पिटलमध्ये आली. या लहानग्या बाळावर उपचार कसे करायचे? याचं आव्हान डॉक्टरांपुढं होतं. परंतु बालरोगतज्ज्ञ डॉ. पारस कोठारी आणि त्यांच्या टीमनं ही शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. तब्बल सहा तास शस्त्रक्रिया करून त्यांनी दोन लिंगांचं एक लिंग केलं, तर तिसरं लिंग काढून टाकलं.
या मुलाच्या नैसर्गिक विधीच्या जागीही मांसाचा मोठा गोळा असल्यानं ती जागा बंद झाली होती. यूपीतल्या डॉक्टरांनी पोटाच्या खाली होल करून संडासासाठी जागा करून दिली होती. आता या महिनाअखेरीस पुन्हा एक शस्त्रक्रिया करून त्याची नैसर्गिक विधीची जागाही नॉर्मल बनवली जाणार आहे. त्यानंतर तो मुलगा नॉर्मल आयुष्य जगू शकेल.
अवघड आणि गुंतागुंतीच्या अशा शस्त्रक्रिया केवळ खासगी आणि मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात होतात असा समज आहे. मात्र महापालिकेच्या रूग्णालयातही चांगले उपचार होऊ शकतात, हे यावरून सिद्ध झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.