राष्ट्रवादीची मागणी काँग्रेसने पुन्हा फेटाळली

राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त जागांची मागणी काँग्रेसनं आज पुन्हा एकदा फेटाळली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केवळ जागांची अदलाबदली होऊ शकते असं म्हटलंय. 

Updated: Jul 30, 2014, 08:51 AM IST
राष्ट्रवादीची  मागणी काँग्रेसने पुन्हा फेटाळली title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त जागांची मागणी काँग्रेसनं आज पुन्हा एकदा फेटाळली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केवळ जागांची अदलाबदली होऊ शकते असं म्हटलंय. 

त्याच वेळी जागावाटपाची चर्चा दिल्लीत केंद्रीय नेत्यांनी करण्याच्या NCPच्या सूचनेचं मात्र काँग्रेसनं स्वागत केलंय. समाजवादी पार्टीतून राष्ट्रवादीमध्ये आलेले नवापूरचे विद्यमान आमदार शरद गावित यांच्यासाठी ती जागा सोडण्यासही माणिकरावांनी स्पष्ट नकार दिलाय.
 
दरम्यान, महायुतीत विधानसभा निवडणुकासंबंधी जागा वाटपाच्या चर्चा सुरु असतानाच, महायुतीची सत्ता आल्यास सत्तेत १५ % भागीदारी आणि राज्य विधान परिषदेच्या ४ जागा आपल्या पक्षाला मिळण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी केली आहे.

शिवाय देशाच्या कुठल्याची राज्याचे राज्यपालपद किवा केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपालपद मिळण्याची मागणी देखील आठवले यांनी नागपुरात एका पत्रकार परिषदेत केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडले असल्याने त्यांच्याकरता महायुतीचे दरवाजे कायम बंद झाल्याचे ते म्हणाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.