दुष्काळासाठी ४५०० कोटींची केंद्राकडे मागणी - मुख्यमंत्री

दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे ४५०० कोटी रूपयांची मदत मागण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Updated: Nov 28, 2014, 12:04 AM IST
दुष्काळासाठी ४५०० कोटींची केंद्राकडे मागणी - मुख्यमंत्री title=

मुंबई : दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे ४५०० कोटी रूपयांची मदत मागण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळाचे सावट असून, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राला विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर दिली.

दरम्यान, राज्यातल्या दुष्काळाचा विषय आज लोकसभेतही चर्चिला गेला. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. 

राज्य सरकारनं केलेली विशेष पॅकेजची मागणी पूर्ण करण्याबाबत केंद्र सरकारनं विचार करावा आणि तातडीनं पावलं उचलावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.