पुरावे आढळल्यास सनातनवर बंदी - मुख्यमंत्री

सनातनविरोधात सबळ पुरावे आढळले तर बंदी घालणार, मात्र पुरावे नसल्यास कुणाचाही दबाव आला तरी बंदी घालणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. 

Updated: Oct 7, 2015, 11:59 PM IST
पुरावे आढळल्यास सनातनवर बंदी - मुख्यमंत्री  title=

मुंबई : सनातनविरोधात सबळ पुरावे आढळले तर बंदी घालणार, मात्र पुरावे नसल्यास कुणाचाही दबाव आला तरी बंदी घालणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. 

सरकार राजधर्माचं पालन करणार असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी झी 24 तासच्या रोखठोक मुलाखतीत दिली. 

घोटाळेबाजांवरही कारवाई करणार

घोटाळेबाजांची जागा निश्चित करून ठेवली आहे. त्यामुळं चौकशीत जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई होणारच असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तासच्या रोखठोक मुलाखतीत व्यक्त केलाय. 

घोटाळेबाजांसोबत कुठलीही सेटलमेंट होणार नाही अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.