कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर पत्रकार निखिल वागळे?

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यानंतर आता कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर पत्रकार निखिल वागळे असल्याचं सांगण्यात येत आहे. टीव्ही मीडियात याविषयी बातम्या प्रसारीत झाल्या आहेत.

Updated: Sep 21, 2015, 02:41 PM IST
कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर पत्रकार निखिल वागळे? title=

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यानंतर आता कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर पत्रकार निखिल वागळे असल्याचं सांगण्यात येत आहे. टीव्ही मीडियात याविषयी बातम्या प्रसारीत झाल्या आहेत.

'सनातन'चा पूर्णवेळ साधक समीर गायकवाड याला पोलिसांनी अटक केली. समीरला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. समीरच्या फोन संभाषणातून महत्‍त्‍वाचे पुरावे मिळाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

दाभोळकर-पानसरे यांच्‍या पाठोपाठ महाराष्‍ट्रात आता ज्‍येष्‍ठ पत्रकार निखिल वागळे हे कट्टरवाद्यांच्या निशाण्‍यावर होते, हे स्‍पष्‍ट झाल्याचं सांगण्यात येतंय.

नरेंद्र दाभोलकर तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्‍या हत्‍येनंतर, निखिल वागळे यांनी टीव्‍ही शोमधून कट्टरवाद्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यावरून वागळे हे चौथे टार्गेट होते हे फोन संभाषणावरून स्पष्ट होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.