चेंबूर : चेंबूरच्या मागासवर्गीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल सापडल्यानं खळबळ उडालीय. सामाजिक न्याय विभागाच्यावतीनं चालवण्यात येणा-या या वसतिगृहात सकाळच्या जेवणात पाल शिजल्याची घटना घडलीय.
वसतिगृहात यापूर्वी देखील असे प्रकार घडलेत. आमच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ कधी थांबणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय. संबंधित ठुबे मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून त्या कंत्राटदाराची हकालपट्टी करा, अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे सचिव आदित्य श्रावस्ती यांनी केलीय. याआधी वरळीतल्या वसतिगृहातही जेवणात पाल सापडली होती, मात्र त्यावेळी काहीच कारवाई झाली नाही, याकडंही श्रावस्ती यांनी लक्ष वेधलंय.