शौचालयाच्या कमोडसह टाकीत पडून महिलेचा मृत्यू

शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू झालाय. मुंबईतील मानखुर्द भागात महाराष्ट्रनगरमध्ये ही घटना घडलीये. कल्पना पिंपळे असं मृत महिलेचं नाव आहे. 

Updated: Mar 4, 2015, 04:00 PM IST
शौचालयाच्या कमोडसह टाकीत पडून महिलेचा मृत्यू title=

मुंबई : शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू झालाय. मुंबईतील मानखुर्द भागात महाराष्ट्रनगरमध्ये ही घटना घडलीये. कल्पना पिंपळे असं मृत महिलेचं नाव आहे. 

कल्पना पिंपळे या शौचालयात गेल्या असता कमोडसह त्या टाकीत पडल्या. एका मुलीच्या ही घटना लक्षात आली आणि तिनं मदतीसाठी प्रयत्न केले. 

फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. महापालिकेच्या सफाई विभागाने २० फूट खोल असलेली टाकी साफ़ करण्यास सुरुवात केली. ज्यावेळी टाकी पूर्ण साफ़ होईल, तेव्हाच या महिलेचा मृतदेह बाहेर काढता येईल. 

पंचमुखी सामाजिक सेवा संस्था हे शौचालय चालवत आहे. दरम्यान, घटनास्थळी जमाव संतप्त झाला होता. परीसरात पोलीसांचा बंदोबस्त ठेवला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.