मुंबई : सणासुदीला झेंडूच्या फुलांची मागणी नेहमीच वाढते. आजचा दसराही याला अपवाद नाही.
झेंडूची मागणी वाढली असली त्याच्या तुलनेत झेंडुची आवक वाढल्यामुळं शेतकऱ्याच्या पदरी ऐन दसऱ्याला संक्रात आलीय. मुंबईच्या बाजारात थेट झेंडू विक्रीला आणणाऱ्या शेतकऱ्याला समाधानकारक भाव मिळालाय.
मात्र ज्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला झेंडू विकली आहेत त्या शेतकऱ्याच्या पदरी किलोला केवळ सात ते आठ रुपये पडले आहेत. त्यामुळं झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय.