टोल नाक्यावरील लूट आता कमी होणार

टोलवर वसूल होणारा पैसा म्हणजे लूट आहे, यात आता वाहन धारकांचं दुमत राहिलेलं नाही, कारण याचा कोणताही हिशेब नाही, पण एक दिलासा दायक बाब म्हणजे ही लूट आता कमी प्रमाणात होणार आहे.

Updated: Dec 9, 2014, 06:49 PM IST
टोल नाक्यावरील लूट आता कमी होणार title=

मुंबई : टोलवर वसूल होणारा पैसा म्हणजे लूट आहे, यात आता वाहन धारकांचं दुमत राहिलेलं नाही, कारण याचा कोणताही हिशेब नाही, पण एक दिलासा दायक बाब म्हणजे ही लूट आता कमी प्रमाणात होणार आहे.

कारण शहरात नियमितपणे ये-जा करणाऱ्यांसाठीचा मासिक पास आता 1200 रुपयांवरुन 350 रुपये करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मांडण्यात येण्याची शक्यता आहे.
 
मुंबईमध्ये दररोज ये-जा करणारे अनेक वाहन चालक आहेत. ज्यांना किमान 70 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. या वाहनचालकांची संख्या हजारोंमध्ये आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्यास वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हा प्रस्ताव मांडणार असल्याचं कळतं आणि या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर मुंबईकर प्रवाशांचे महिन्याकाठी सुमारे 900 रुपये वाचणार आहेत.
 
एमएसआरडीसी दहीसर, मुलुंड, ठाणे, वाशी आणि ऐरोली या टोल नाक्यांवरुन वसुली करते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.