नाईट कॉलेजची बत्ती गुल, मनसेनं घेतली दखल!

संस्थाचालक आणि प्राचार्यांच्या वादात शिक्षणाचे तीनतेरा कसे वाजतात याचं उदाहरण सांताक्रूझच्या अनुदानित पब्लिक नाईट डिग्री कॉलेजमध्ये पाहायला मिळतंय. कॉलेजमध्ये वीज नसल्यामुळं एमकॉमची परीक्षा पुढं ढकलावी लागलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 23, 2013, 03:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
संस्थाचालक आणि प्राचार्यांच्या वादात शिक्षणाचे तीनतेरा कसे वाजतात याचं उदाहरण सांताक्रूझच्या अनुदानित पब्लिक नाईट डिग्री कॉलेजमध्ये पाहायला मिळतंय. कॉलेजमध्ये वीज नसल्यामुळं एमकॉमची परीक्षा पुढं ढकलावी लागलीय.
या कॉलेजमध्ये पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरच परीक्षा होती आणि नेमकी याच मजल्यावरची वीज गायब करण्यात आल्याचा आरोप प्राचार्यांनी केलाय. तर वीज नसलेल्या ठिकाणीच जाणूनबुजून परिक्षा घेतल्याचा आरोप संस्थाचालकांनी केलाय.
या कॉलेजला ८४,४८० रूपयांच्या थकीत वीजबिलाची २ वेळा नोटीस आली होती. दरम्यान मनसेनं या प्रकरणाची दखल घेत काल संध्याकाळी या कॉलेजमध्ये जाऊन गोंधळ घातला. तसंच कॉलेजचं अनुदान आणि मान्यता रद्द करण्याची मागणी केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.