राज्यात दुष्काळ, मंत्रालयात बाटलीबंद पाण्याचा 'महापूर'

मंत्रालयातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाच महिन्यात २४ हजार ६४८ लिटर पाणी प्यायले आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या पाण्याची एकूण किंमत ४ लाख ६६ हजार १९ रुपये आहे. 

Updated: May 27, 2015, 01:16 PM IST
राज्यात दुष्काळ, मंत्रालयात बाटलीबंद पाण्याचा 'महापूर' title=

मुंबई: मंत्रालयातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाच महिन्यात २४ हजार ६४८ लिटर पाणी प्यायले आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या पाण्याची एकूण किंमत ४ लाख ६६ हजार १९ रुपये आहे. 

माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघड झालेल्या या माहितीनुसार, डिसेंबर ते एप्रिलदरम्यान बाटलीबंद पाण्यासाठी हे लाखो रुपये खर्च केले आहेत. एकीकडे राज्यात पडलेला भीषण दुष्काळ आणि पाण्याच्या एक-एक थेंबासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. या सर्वांची जाणीव मंत्रालयातील उच्चपदस्थांना असतांना त्यांची बाटलीबंद पाण्याची आवड योग्य नाही. 

विषेश म्हणजे या पाण्यासाठी मुंबई महानगरपालिका फक्त १७१ रुपये आकारते. तसंच मंत्रालयात स्वच्छ पाणी पुरवणारी यंत्रंही चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.